आधारकार्ड बनवण्यासाठी केंद्रचालकाकडून लुट

0

चाळीसगाव । आधारकार्ड सर्व ठिकाणी सक्तीचे झाल्याने त्याचे मोल आता सर्वांना कळाले आहे व काही दिवसात बरेच आधारकार्ड केंद्र बंद पडल्याने शहरात एकच भडगाव रोडवर असलेल्या केंद्रात ग्राहकांची आर्थिक लुट केली जात असुन प्रत्येकाकडून 200 ते 300 रुपये घेतले जात आहेत. ही आर्थिक लुट थांबवावी, अशी मागणी आता होवु लागली आहे. शासनाने आधार कार्ड सक्तीचे केल्याने ते काढणे सर्वांना बंधनकारक आहे, त्यासाठी चाळीसगाव शहरात काही केंद्रे देखील आधारकार्ड तयार करण्याचे काम करीत होते, मात्र ते केंद्रे बंद झाल्याने शहरात भडगाव रोडवर आपले सरकार नावाचे एकच आधार कार्ड केंद्र आहे.

केंद्रचालकांची मनमानी
बरेच नागरीक आधार कार्ड काढण्यासाठी याठीकाणी गर्दी करुन असतात याचाच फायदा घेवुन आधार कार्ड केंद्र चालक मनमानी पध्दतीने प्रत्येकाकडून 200 ते 300 रुपये घेवुन काम करीत असल्याचे बोलले जात आहे. खरे पाहता शासकीय दर नुसार 25 ते 30 रुपये आकारणी केली पाहीजे पण तसे होताना दिसत नाही आणि शहरात एकमेव आधार कार्ड केंद्र असल्याने नागरीकांना वेठीस धरुन पैशांची मागणी केली जात असल्याचे आता बोलले जात आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास नंतर या, ऑनलाईन सर्व्हर बंद आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देवून ग्राहकांना तेथुन काढून देत असल्याचे देखील बोलले जात आहे. तहसीलदार चाळीसगाव यांनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता होवू लागली आहे.