लंडन । जागतिक बुद्धिबळातील आघाडीच्या दहा बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या लंडन क्लासिक स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारताच्या विश्वनाथन आनंदने 44 चालीनंतर अमेरिकेच्या हिकारुन नाकामुराला बरोबरीत रोखले. या सामन्यात आनंदला अनेकवेळा वर्चस्व मिळवण्याची संधी मिळाली होती. पण गुंतागुंतीच्या खेळामुळे दोघांनाही अंदाज बांधणे कठीण जात होते. त्यात एक जादा प्यादे असूनही आनंदने सामना बरोबरीत राखण्याचा निर्णय घेतला. आनंदला सुरुवातीला ओपनिंग मिळू न देण्यात नाकामुरा यशस्वी झाला होता. रेटी ओपनिंगपासून सुरू झालेला खेळ शेवटची किंग्ज्स इंडियन डिफेन्सपर्यंत आला होता. डावातील 24 व्या चालीनंतर नाकामुराने आनंदवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला होता.