चाळीसगाव । शहरातील आनंदवाडी परिसराला विविध समस्यांनी ग्रासले असून यामुळे नागरिक हैराण झाले आहे. आंदोलनाचा इशारा देऊनही नगरपालिकेने या परिसराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असून नागरिक पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुख्याधिकार्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरली असून तात्काळ या भागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिनाभराचा अल्टीमेटम
मुख्याधिकार्यांच्या अश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्या नतंरही भागात समस्या जैसे -थे आहे. आनंदवाडी ते ब्रीज कॉर्नर पर्यत भुयारी गटारी तयार करावी, कारण सध्या असलेल्या गटारातील सांडपाणी घरापर्यंत जात असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, आनंदवाडीतील शौचालयाची दुरावस्था झाली असून नवीन शौचालयाची निर्मिती करावी, परिसरात नियमित साफसफाई व फवारणी करावी, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी ही गटारीतून जात असल्याने दुगंधीयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. यामुळे साथीच्या रोगाची लागण होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात डाँ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सभागृह बांधण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या असून या समस्यांचा निपटारा महिन्याभरात न झाल्यास जनआंदोलन खान्देश विभाग, आंनदवाडीतील नागरिकांना सोबत घेऊन 11 जून रोजी सकाळी 11 वाजता न. पा .प्रशासकीय इमारतीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.