आनंदीबाई बंकट मुलींच्या विद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ उत्साहात

0

वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेवर विद्यार्थ्यांनी दिलेला भर कौतुकास्पद
स्वच्छता पंधरवडाच्या समारोप प्रसंगी डॉ.सुनिल राजपूत यांचे प्रतिपादन
चाळीसगाव – वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छततेसाठी तन मन आणि धनाने काम केल्यास आपोआपच राज्य नव्हे, तर पर्यायाने देशाची स्वच्छता करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. संत गाडगेबाबा, विनोबा भावे, सेनापती बापट यासारख्या महामानवांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आपण कृतीतून अंगिकारायला हवा स्वाभिमान बाळगला तर खऱ्या अर्थाने देश संपन्न होईल. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजून घेत वैयक्तिक स्वच्छतेसोबत आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्य निरोगी राहत असल्याचे डॉ.सुनिल राजपूत यांनी सांगितले. आनंदीबाई बंकट मुलींच्या विद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या स्वच्छता अभियानामध्ये चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात तर गीतगायन स्पर्धेतून स्वच्छता संदर्भात जनजागृती करण्यात आली. यात सहभागी विद्यार्थीनींना गौरविण्यात आले. शहरातील आ.बं.मुलींचे हायस्कूलमध्ये स्वच्छता पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. स्वच्छता मोहीम अंतर्गत शाळेत स्वच्छतेविषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्याचा समारोप सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनिल राजपूत, गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापिका निर्मला झोपे, उपमुख्याध्यापक साहेबराव मोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप भांडारकर, रमेश रोकडे, क्रिडा शिक्षक प्रवीण राजपूत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

‘स्वच्छतेचे इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे स्वच्छता पंधरवड्यात विद्यार्थीनींचा सहभाग नावीन्यपूर्ण राहिला असून निर्मळ विचाराने व स्वच्छतेच्या ध्येयाने प्रेरित झाल्याचे समाधान मिळाले असे सांगत प्रत्येकाने जर स्वच्छतेचा गुण अवलंबविला तर देश स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल. आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखत पर्यटनस्थळी, बागेत, शाळेच्या परिसरात आपल्याला अस्वच्छता दिसू नये, यासाठी आपण काळजी घ्यायला हवी.

यावेळी रोटरी क्लबच्या वतीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासंदर्भात हात धुण्याविषयक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात मधुकर कासार यांनी हात धुतांना घ्यावयाची काळजी व स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन केले तर विद्यार्थीनींनी सहभाग घेत माहीती जाणून घेतली यात ॲड.प्रदीप अहिरराव यांनी स्वच्छता पंधरवडा यशस्वी झाल्याचे सांगताना उपक्रमशील कृतीतून मुलींनी स्वच्छतेचा अभिनव संदेश दिला आहे प्रत्येकाने याबाबत जागरुक रहायला हवे असे सांगितले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
सुत्रसंचालन दिलीप जैन यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक साहेबराव मोरे यांनी मानले. यावेळी मिलिंद शेलार, आशालता राजपूत, सीमा माळदकर, वंदना मोराणकर, केतन कुऱ्हाडे, अलका शाह, निलेश सोमवंशी, रामसिंग राजपूत, विजय देवरे, दिनेश महाजन आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.