वाकड : येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची पाचवी वार्षिक सभा उत्साहात पार पडली. संघाचे संस्थापक-अध्यक्ष भागवत कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मयुर कलाटे होते. यावेळी दीपप्रज्वलन नगरसेवक कलाटे, स्वाती कलाटे, श्रीकांत रेवणवार, मुरलीधर लहाने तसेच उत्तमचंद चोरडीया यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉक्टर, वकिल व अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत सदस्यांना व माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक मयुर कलाटे आणि स्वाती कलाटे यांनी मनागेत व्यक्त केले.
हे देखील वाचा
संघाचे सचिव रेवणवार यांनी मागील वार्षिक सभेच्या अहवालाचे आणि पाचव्या वार्षिक सभेच्या नोटीसीचे वाचन केले. संघाचे अध्यक्ष कोल्हे यांनी यावर्षीच्या अहवालाचे वाचन केले. भास्कर यांनी पुढील 5 वर्षासाठी निवडून आलेल्या 23 कार्यकारीणी सदस्यांना निवडपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. 29 नोव्हेंबरला परदेशी जाणार्या 44 सदस्यांना आगाऊ शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिरमे व सुरेखा बोरकर यांनी केले. संघाला सहकार्य करणार्या नगरसेवक मयुर कलाटे व इतर सर्व व्यक्तींचे अमृत पाटील यांनी आभार मानले.