आपची मनपा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक

0

जळगाव । आगामी महानगरपालिका निवडणूका संदर्भात आढावा बैठक 13 मे रोजी घेण्यात आली. व काही धोरणात्मक बाबीवर सखोल चर्चा होऊन लोकतांत्रिक पध्दतीने जळगाव शहरात 10 प्रभागात प्रभाग प्रमुख व बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहर कार्यालय महानगराध्यक्ष ईश्‍वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निरीक्षक अ‍ॅड.प्रभाकर वायचळे, शहर निरीक्षक डॉ. नितीन नांदुरकर व अतिरीक्त निरीक्षक जितेंद्र जैन यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीतर्फे आढावा बैठक घेण्यात आली.

महिला मंचच्या नियुक्त्या याप्रमाणे
10 प्रभागात प्रभाग प्रमुख व बुथ प्रमुखांच्या नियुक्त्यांसह ताराराणी महिला मंचाच्या नियुक्त्या देखील यावेळी करण्यात आल्या. प्रभाग क्र.1 जमशेर शेख, प्रभाग क्र.2 दिपक सुरळकर, प्रभाग क्र.3 राजेंद्र पाटील, प्रभाग क्र.4 शांताबाई इंगळे, प्रभाग क्र.11 मध्ये राहुल निंबाळकर, प्रभाग क्र.12 अनिल वाघ, प्रभाग क्र.13 योगेश हिवरकर, प्रभाग क्र.18 राकेश वाघ तसेच महानगर रिगल सेल वर अ‍ॅड.किरण तेली यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला संघटनामध्ये शबाना पटेल, सुनिता शाहु, शोभा कुमावत, शोभा मोरे, सोनल निंबाळकर, संगिता नेरकर, प्रिती जाधव, छाया पाटील, सुजाता पाटील, रूपाली भावसार, मिराताई सोनवणे इ. पदाधिकार्‍यांवर संघटन बांधणीची जबाबदारी देण्यात आली.

सदस्य नोंदणीचे आवाहन
दुसर्‍या सत्रात आम आदमीच्या समस्या व सदस्य नोंदणीचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच ’माझ्या स्वप्नातील जळगाव‘ ही लेखन स्पर्धाचे आयेजन केले असून 12 ते 31 मे दरम्यान लोकार्पण करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमास डॉ.सुनिल गाजरे, योगेश हिवकर, तुषार निकम, नारायण जेटवाणी, महेश मंडोरे, नरेंद्र कोळी, राहुल निंबाळकर, सुकदेव पाटील, दिपक सुरळकर, रवी चव्हाण, इ. उपस्थिती व सहकार्य लाभले. तसेच नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे ईश्‍वर मोरे यांनी स्वागत व अभिनंदन केले.