दिल्ली:आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी भाजपाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. दिल्ली मध्ये गौतम गंभीर चे समर्थक काही पत्रके वाटत आहेत. या पत्रकांमध्ये माझ्या जातीविषयी , माझ्या आई वडिलां विषयी, माझ्याबाबत काहीअपशब्द वापरले आले आहेत, असा आरोप आतिशी यांनी गौतम गंभीर यांच्यावर केला आहे. आतिशी मार्लेना यांनी पत्रकार आयोजित केली होती, त्या पत्रकार परिषदेत आतीशी यांना रडू कोसळले. जी पत्रकं माझ्याविरोधात गौतम गंभीरचे समर्थक वाटत आहेत ते पत्रक वाचनेही लज्जास्पद आहे असेही आतिशी यांनी म्हटले आहे.
जेव्हा गौतम गंभीर देशासाठी खेळत होते, तेव्हा त्यांनी चौकार, षटकार मारल्यावर सगळेच टाळ्या वाजवत होते. मात्र गौतम गंभीर यांची महिलांविषयी मानसिकता इतकी खालच्या दर्जाची असेल असे कधी वाटलेही नव्हते असेही आतिशी यांनी ले पत्रकार परिषदेत म्हटले आहे. जर अशा मानसिकतेचे लोक निवडून आले तर ते महिलांच्या सुरक्षेबाबत किती सजग रहातील? असाही प्रश्न आतिशी यांनी विचारला.
निवडणूक प्रचार करताना भाजपा किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे दाखवून दिले. माझ्याबाबत जी काही पत्रके वाटली जात आहे. या पत्रकांमधूनच भाजपाची महिलांविषयीची मानसिकता कशी आहे, हे या वरून लक्षात येते असेही आतिशी यांनी म्हटले आहे. माझ्याबद्दल भाजप चे नेते गौतम गंभीर यांनी पत्रकांमध्ये जे लिहिले आहे ते धक्कादायक आणि हीन मानसिकतेचे आहे असेही आतिशी यांनी म्हटले आहे.