नवी दिल्ली-पटियाला न्यायालयात सीबीआयने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन आणि त्यांची पत्नी पूनम जैनसह चार कंपन्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने २९ रोजी याबाबत चौकशी करण्यास मंजुरी दिली होती. २४ ऑगस्ट २०१७ ला याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सीबीआयने सतेंद्र जैन, पूनम जैन आणि अन्य चार कंपन्या प्रयास इंफोसिस सोल्युशंस, अकिंनचन डेवलपर्स, मंगलायतन प्रोजेक्ट व इंडो मेटल इंपेक्स प्राइवेट लिमिटेडवर आरोप करण्यात आले आहे.