नगरदेवळा। शहरातील वास्तु आरोग्यम परिवारातर्फे आज शनिवार 13 मे रोजी सुप्रसिद्ध वास्तुउर्जा तज्ज्ञ डॉ. अविनाश कुळकर्णी यांचे आपली वास्तु व आपले आरोग्य या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन विसनजी नगरातील वास्तु आरोग्यमच्या दालनात सायंकाळी 6 वाजेला होणार आहे.
प्रवेश निःशुल्क असलेल्या या व्याख्यानासाठी वास्तुशास्त्र अभ्यासक, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर, आयुर्वेद डॉर्क्ट्स, प्राध्यापक, स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी, कॉन्ट्रॅक्टर्स तसेच वास्तुविषयी, आपल्या घराविषयी जिव्हाळा असणार्या सर्व जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, वास्तू आरोग्यम् परिवारातर्फे करण्यात आले आहे. वास्तुउर्जा वास्तुशास्त्र, वास्तुपरिक्षण, पाणी परीक्षण, याविषयीचे तज्ञ तथा डाऊझिंग,मास्टर अशीही त्यांची आहे. वास्तु आरोग्यम परिवारातर्पे आयोजित त्यांचे व्याख्यान सर्वांसाठी निःशुल्क असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.