आपल्या घरी शौचालय बांधून सदृढ व निरोगी जीवन जगावे

0

जामनेर । आजच्या तंत्रयुगात संगणक शिक्षणाची बालपणापासूनच खरी गरज असून स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रसेकाने आपल्या घरी शौचालय बांधून याला शोपीस न ठेवता त्याचा नियमित वापर करावा. घरी वैयक्तिक शौचालय नसल्यास उघड्यावर न जाता गावातील सार्वजनिक शौचालयाचा वापर करुन आपल्या परिसरात होणारी रोगराई टाळून सदृढ व निरोगी जीवन जगावे, असे प्रतिपादन जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी केले. जामनेर तालुक्यातील खादगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ग्रामपंचायततर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारी मुक्ती, शाळेसाठी दोन संगणक वितरण व प्रेरणा सभा, अशा तिहेरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.इंगळे बोलत होते.

हगणदरीमुक्तीसाठी गीतांमधून जनजागृती
दिनकर सुरडकर व माधव सुरवाडे यांनी गाव हगणदारीमुक्ती या विषयांवर गीताचा कार्यक्रम सादर केला. येणारा काळ हा संगणक साक्षरतेचा असून शैक्षणिक व गुणवत्ता विकासासाठी तसेच शाळेच्या भौतिक गरजापूर्ण करण्यासाठी पालकांसह सर्व गावकर्‍यांनी शाळेस सहकार्य करावे, असे आवाहन व्ही.व्ही.काळे यांनी प्रेरणा सभेत केले. गावकर्‍यांना हगणदारी मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील, ग्रामसेवक अमोल देशमुख, धोंडू चौधरी, श्रीराम पाटील, गोपाल सोनवणे, गजानन बावस्कर, मुकेश चौधरी, संतोष कुमावत नंदकिशोर शिंदे, सुभाष माळी, गजानन सैतवाल यांच्यासह पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जामनेर पं.स.शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.व्ही.काळे, सरपंच पद्माकर चौधरी, माजी सरपंच प्रमोद चौधरी, ग्रा.पं.सदस्य सुरेश गोराडे, विलास चिंचोले, समाधान सपकाळे, नारायण शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिका चिंचोले, सदस्य जितेंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर तायडे, श्रावण चौधरी, पोलीस पाटील तुकाराम मोरे, संतोष पाटील, शरद पाटील आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.