बोदवड- तालुक्यातील आमदगाव येथील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणी 25 रोजी शेलवड येथे शिक्षणासाठी गेली असता घरी न परतल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती आढळून न आल्याने तिच्या पित्याने बोदवड पोलिसात तक्रार नोंदवली. तपास उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत.