धुळे । दि.8 एप्रिलपासून धुळे तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली असून ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. आ.कुणाल पाटील यांच्या सपत्नीक श्रमदानाने न्याहळोदकरांच्या शेकडो हातांना बळ मिळाले आहे. दरम्यान पाणी फाऊंडेशनने दुष्काळाला हरविण्याचे आव्हान स्विकारले असून त्यात ते यशस्वी होत आहे. वॉटरकप स्पर्धेमुळे धुळे तालुक्यातील दुष्काळ दूर होण्यास निश्चित मदत होईल अशी प्रतिक्रीया आ. कुणाल पाटील यांनी व्यक्त केली. ती दानात दान श्रेष्ठ श्रमदान, पाणी वाचवा जीवन फुलवा अशा घोषणांमुळे श्रमदान करणार्यांचा उत्साह दुणावला होता.
दुसर्या दिवशीही उत्साह कायम
दि.9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता श्रमदानाला सूरूवात करण्यात आली. गावातून माता बघिनी, पुरूष, लहान मुले, युवक मिळेल त्या वाहनाने श्रमदानाच्या ठिकाणी हजर झाले. तर गावातील कार्यर्त्यांनी महिलांसाठी मोठ्या वाहनाची व्यवस्था केली होती. ठरल्याप्रमाणे हातात टिकाव फावडा, आणि घमेल घेवून स्वताहून कामाला लागली. माथा ते पायथा या सुत्राप्रमाणे शेत शिवारात समतल चर खड्डे खोदून त्याचा बाजून मातीचे बांध घातले जात आहेत. ज्यामुळे वाहून जाणारे पाणी अडविले जाईल. तसेच शेतशविरातील नाल्यात आखणी करुन नाला बंडीग दगड गोट्यांचे बांध बाधले जाणार आहे. पहिल्या दिवशी असणार उत्साहात कमी न होता दुसर्या दिवशीचा उत्साही तेवढाच असल्याने पाणी फाऊंडेशनची चळवळ मनात मनात रुजल्याचे अनुभव बघण्यास मिळाले.
हातात हात घेवून काम करा
प्रत्येकाने हाताहात घेवून काम केले तरच आपले गाव आणि तालुका दुष्काळमुक्तीकडे जाऊ शकतो. पाणी फाऊडेशनच्या या चळवळीत सहभागी होवून मनापासून श्रमदान करावे असे आवाहन आ. कुणाल पाटील यांनी श्रमदान करतांना दिला. त्यांच्यासोबत सौ. अश्विनी कुणाल पाटील, पं.स.सदस्य मुकेश पवार, प्रकाश वाघ, नाना माळी उपसरपंच, माजी सरपंच कैलास पाटील, माजी सरपंच डॉ.भरत रोकडे, कैलास पाटील, विजय माळी, दिपक वाघ, दिलीप भोगे, प्रशांत अहिरे, कविता वाघ, सपना वाघ, बानुबाई भिल, आशाबाई भिल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून श्रमदानास सुरूवात
धुळे तालुक्यात अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा दि. 8 एप्रिलपासून सुरूवात झाली आहे. स्पर्धेत असणार्या गावातील ग्रामस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून आ. कुणाल पाटील हे सपत्नीक सहभागी होवून श्रमदान करीत आहेत. धुळे तालुका गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत दुष्काळाशी दोन हात करीत आहे. येथील बळीराजा या संकटाशी लढा देत आहेत पाण्याच्या संकटाने हतबल झालेल्या शेतकर्यांना पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे बळ मिळेल आणि धुळे तालुका दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे.
महीलांही सक्रीय
न्याहळोद येथील सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रातील व्यक्तींबरोबर महीलांचाही सक्रीयपणे सहभाग पाहण्यास मिळाला. पुरुषांबरोबरीने महिलाही टीकाव फावडा आणि घमेल हाता घेवून वॉटकपच्या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. सकाळी 9 पासूनच श्रमदानाला सुरूवात झाली. महिला, तरुण आणि लहान मुले श्रमदानाबरोबरच उत्साह वाढविणार्या व सामाजिक संदेश देणार्या जागृतीपर घोषणा देत होते. मिलकर बोलो एक साथ दुष्काळावर करु मात, पाणी वाचवा पर्यावरण वाचवा, दानात दान श्रेष्ठ श्रमदान, पाणी वाचवा जीवन फुलवा, माती अडवा पाणी जिरवा अशा घोषणांनी कार्यकर्त्यांसह शेत शिवारातही उत्साह संचारला होता.