आमदारांनी नगरसेवकांच्या मानसिकतेतून बाहेर पडावे

0

जळगाव । आमदारांनी नगरसेवकांच्या मानसिकतेतून बाहेर पडावे, शहरातील रस्ते, स्वच्छता, पथदिवे आदी प्रश्न सोडविण्यासाठी भाजप पक्षाचे नगरसेवक आहे. यामुळे आमदार सुरेश भोळेंनी मनपाच्या संदर्भातील व शहराच्या विकासासाठी शासनदरबारी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जोर लावावा असे आरोप माजी स्थायी सभापती व नगरसेवक नितीन बरडे यांनी आज केले. श्री. बरडे यांनी सोमवारी महापालिकेतील लोकशाही दिनामध्ये आमदार भोळेंनी त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाबाबत पत्रकार परिषद घेवून नाराजी व्यक्त केली.

माजी स्थायी सभापती बरडे यांचा आ.भोळे यांना सल्ला
सर्वसामान्य नागरिकांसाठी तक्रारी या लोकशाही दिनात सोडविल्या जात असताना अशा प्रकारे मोर्चा आणून अधिकार्‍यावर दबाव आणणे योग्य नसल्याचेही श्री. बरडे यांनी सांगितले. आमदार हे महापालिका अधिकार्‍यांना केव्हाही बोलावून त्यांच्याशी चर्चा करू शकत असतांना त्यांनी लोकशाही दिनात असे गोंधळ घालणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. अधिकार्‍यांना अर्वाच्य भाषेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे लोकशाही दिनात बोलले हे योग्य नव्हते. शहराच्या समस्यांबाबत त्यांच्या पक्षाचे नगरसेवक आवाज उठविण्यास आहेत. आमदारांनी महापालिकेच्या तसेच शहराच्या विकासासंदर्भातच महत्त्वाचे शासन दरबारी, गाळे ताब्यात, हुडको कर्ज, शिवाजीनगर, भोईटेनगर रेल्वे उड्डाणपूल असे आदी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना ताकद लावायला हवी. परंतू हे महत्त्वाचे विषय सोडून ते त्यांच्या नगरसेवकांनी हाताळले पाहिजे असे विषय हे आमदार साहेब हाताळत असून त्यांत हस्तक्षेप करीत आहेत. समांतर रस्त्यांबाबत ते त्यांच्या सरकारविरोधात सामाजिक संघटनेच्या मोर्चात उतरता. तसेच अंजिठा चौक सुशोभीकरण होवू न देण्यास मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या माध्यमातून दबाव आणून अडथळा आणत असून 25 कोटींच्या निधी मालामाल विकली लॉटरी’चे ते स्वःता डायरेक्ट असून त्यांच्यामुळे अद्याप या निधीतून विकासकामे झालेले नाही असा गंभीर आरोप बरडे यांनी केला आहे.