आमदार अनिल गोटेंसह सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करा

0
शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन
धुळे :- पांझरा नदी किनारी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले मंदिरे अनधिकृतपणे पाडून हिंदु धर्माची मानहानी, महंत तसेच भक्तांची बदनामी करणार्या आ.अनिल गोटे आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.  आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगर प्रमुख सतीश महाले, माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रथम महापौर भगनवान करनकाळ, अतुल सोनवणे, शाखा प्रमुख कैलास मराठे, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, अ‍ॅड.पंकज गोरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.