आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : खडसे फार्म हाऊसवर दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी

मुक्ताईनगर : लोकनेते व माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव केला. खडसे फार्म येथे दिवसभर खडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. शुक्रवारी सकाळी मंदाताई खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. त्यानंतर खासदार रक्षा खडसे, कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे, डॉ.प्रांजल खेवलकर व परीवारातील सदस्यांनी खडसे यांना शुभेच्छा दिल्या.

खडसे यांची लाडूतुला
भुसावळचे आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, गोलू पाटील, सदानंद उन्हाळे, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, शेखर पाटील, धनंजय चौधरी, लिलाधर चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. शहाद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी डॉ.तुषार सनांसे यांच्या तर्फे एकनाथ खडसे यांची लाडू तुला करण्यात आली. पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गोल्डमन प्रशांत सपकाळ यांनी आणलेला एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेचा 70 किलो वजनाचा केक कापण्यात आला. धुळे येथील सुनील नेरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, योगेश मुकुंदे व सहकार्‍यांनी मोठ्या पुष्पहाराने एकनाथ खडसे आणि परीवाराचा सत्कार केला.

कोथळी ग्रामस्थांतर्फे सत्कार
संध्याकाळी कोथळी ग्रामस्थांतर्फे खडसे यांचा कोथळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण चौधरी, उमेश राणे, योगेश पाटील, योगेश चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, पवन चौधरी, जगदीश चौधरी उपस्थित होते. संजय कपले यांच्यातर्फे एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांचे फोटो असलेल्या पिशव्यांचे अनावरण करून वाटप करण्यात आले.

दिवसभरत खडसे फार्म हाऊस गजबजलेले
खडसे फार्म हाऊसवर भुसावळचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, मुक्ताईनगर नगराध्यक्ष मनिषा पाटील प्रा.सुनील नेवे, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, युवक सरचिटणीस संदीप पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, जि.प.सदस्य निलेश पाटील, कैलास सरोदे, वैशाली तायडे, वनिता गवळे, रामदास पाटील यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच मुक्ताईनगरातील योगराज कन्ट्रक्शनचे संचालक योगराज सोनवणे व प्रमोद सोनवणे यांनी खडसे यांचा सत्कार केला.