आमदार किशोर दराडे यांच्या विजयाने शिवसैनिकांमध्ये उत्साह

0

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर फटाक्यांची आतषबाजी

भुसावळ- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक सेना व शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर शहरातील स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी सकाळी बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

विधानसभेवर सेनेचा भगवा फडकणार -उमाकांत शर्मा
शिक्षक हेच विद्यार्थी व समाज घडवतात व शिक्षकांनी शिवसेना व शिवसेना पुरुस्कृत उमेदवाराला दिलेली पसंती हा सर्वसामान्य जनतेला दिलेला संदेशच असून आगामी काळात विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही व मुख्यमंत्रीदेखील सेनेचा राहील, असा विश्‍वास शिवसेना विभाग प्रमुख उमाकांत (नमा) शर्मा यांनी प्रसंगी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तमराव सुरवाडे, शिवसेना शहरप्रमुख मुकेश गुंजाळ, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब भोई, व्यापारी सेना संपर्कप्रमुख अबरार शेख, विभागप्रमुख उमाकांत (नमा) शर्मा, युवा सेना शहर अधिकारी मिलिंद कापडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख तुषार बर्‍हाटे, नीलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे, दत्तू नेमाडे, सुरेंद्र सोनवणे, राजेश ठाकूर, पिंटू भोई, चेतन नाईक, विक्की चव्हाण, अमोल भालेराव आदींची उपस्थिती होती.