नेत्रतपासणी शिबिर, मुस्लिम वधु-वर मेळावा, अनाथ आश्रमात अन्नदान
पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी गुरूवारी साजरा करण्यात आला. मोहननगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन याठिकाणी अभिष्टचिंन सोहळा पार पडला. वाढदिवसा निमित्त फुगेवाडी येथील जय महाराष्ट्रमित्र मंडळाला पाच लाख रूपये किंमतीचे कुस्ती मॅट आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रदान केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दहा हजार वह्या
हे देखील वाचा
कष्टकरी कामगार संघटनेच्यावतीने नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम घेतला. याचे आयोजन बाबा कांबळे यांनी केले. शिवसेनेच्या फुगेवाडी शाखेच्या वतीने गरीब विदयार्थ्यांना 10 हजार वहयांचे वाटप केले. विभाग प्रमुख एकनाथ हाके, शाखा प्रमुख निलेश हाके यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. पुण्यातील खुद्दाम-ए-मिल्लत व आमदार गौतम चाबुकस्वार युवा मंचच्यावतीने मुस्लिम वधु-वर पालक परिचय मेळावा झाला. मिलिंदनगर येथील जामा मस्जिद येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. दापोडी व फुगेवाडी येथील शिवसेना शाखेच्या अनाथ आश्रमात अन्नदान करण्यात आले. यामध्ये विनोद शिंदे, विकास गायकवाड, अजित बोराडे, स्वप्नील शेवाळे यांनी सहभाग घेतला.
सर्वपक्षीय नेत्यांचा वर्षाव
चाबुकस्वार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेश लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, योगेश बहल, हनुमंत गावडे, आझम पानसरे, कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला