चिंचवड :- काळेवाडी मधील पवनानगर येथील ज्योतिबा गार्डनमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. जगताप यांच्या आमदार निधीतून ही जिम उभारण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, देविदास पाटील, नगरसेविका निता पाडाळे, सविता खुळे, सुनिता तापकीर, सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे, नरेश आप्पा खुळे, प्रमोद ताम्हणकर, सजी वर्की, नेताजी नखाते, मंगेश क़दम, धर्मा पवार, संतोष जगताप, दिपक जाधव, भिमाशंकर भोसले, रवींद्र पवार, राजेंद्र भरणे, पवना हेल्थ ग्रुपचे सर्व सभासद आणि नागरिक उपस्थित होते.
आरोग्याची काळजी घ्यावी
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, युवा पिढी, जेष्ठ नागरिक, महिला व भगिनी यांनी ओपन जिमचा वापर करुन शरीर तदुंरूस्त ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी ही ओपन जिम सुरू केली आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली जावी.