आमदार निर्मला रमेश गावित विधानसभेत तालिका सभापतीपदी

0

नवापूर । पावसाळी अधिवेशनात आज महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या तालिका सभापतीपदी इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावीत ह्या सभापतीपदी विराजमान झाल्याने विधानसभेचे कामकाज पाहणार्‍या इगतपुरी मतदार संघाच्या त्यापहिल्या आमदार ठरल्या आहे. विधानसभेत अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षाच्या अनुपस्थितीत तालिका सभापती म्हणून सौ.गावित यांनी कामकाज पाहिले.

माणिकराव गावित यांच्या सुकन्या
सन 2009 साली लोकसभा निवडणुकी नंतर लोकसभेत आमदार निर्मला गावित यांचे वडील माजी खासदार माणिकराव गावित यांनी लोकसभेचे सभापती म्हणून कामकाज पाहिले होते.त्यानंतर आमदार निर्मला गावित यांना विधानसभेत सभापती म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाल्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रथमच इगतपुरी मतदारसंघाला तालिका सभापतीपदाचा मान मिळाल्याने आमदार गावित यांचे त्र्यंबकेश्वर व नंदुरबार,धुळे जिल्ह्यामधून तसेच सर्व पक्षीय नेत्या कडून अभिनंदन होत आहे. आमदार समर्थक यांनी फडाके वाजून स्वागत केले. नवापुरच माहेर असलेल्या आमदार निर्मला गावीत ह्या माजी केद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचा सुकन्या आहेत.