पाचोरा । तूर खरेदी केंद्रावर काल प्रचंड गोंधळ उडाल्याने आज तूर खरेदी शांतपणे सुरळीत सुरु होती. शेतकर्यांचीच तूर मोजली जात होती 31 मे शेवटचा दिवस होता परंतु टोकन दिलेले शेतकरी गोडावूनमध्ये आलेले सर्व शेतकर्यांचे तूर मोजणी करण्याचा आदेश आमदार किशोर अप्पा यांनी डि.एम.ओ. माळी, नायब तहसीलदार सोना मगर, उपसचिव देवरे शेतकरी संघाचे मॅनेजर भावसार व भगवान पाटील, वखार महामंडळाचे तांबे यांना दिले होते. आज जवळपास सर्व शेतकर्यांची तूर मोजण्याचे काम रात्री पर्यंत सुरु होते सर्व शेतकर्यांनी आमदार किशोर अप्पांचे आभार मानले.