आमदार पाडवी यांच्या हस्ते रस्त्यांचे उद्घाटन

0

शहादा । शहादा तालुक्यातील निंबर्डी जवळ नवलपूर मुख्यमंत्री ग्रामसडकयोजनेअंतर्गत 9.50 किमी अंतर असलेल्या रस्त्याचे व त्यात एकूण 52 पाईप मोरी व छोटे पूल असून त्या रस्त्याची एकूण रक्कम 645.51 लक्ष एवढी आहे.

ह्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या रस्त्या अंतर्गत येणार्‍या निंबर्डी आंबापाणी रतनपुरा ते केवडीपाणी धोजापाणी पर्यंत 9.5 किमी अंतर असून वरील गावांना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी पाडवी यांच्या प्रयत्नाने काम मंजूर करण्यात आले.ह्या भूमिपूजनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता वतनकुमार मगरे, इंजी.संदीप पाटील व त्यांचे सहकरी तसेच तालुकाध्यक्ष डॉ .किशोर पाटील, अतुल जयस्वालम, गुलाब पाडवी, काशीराम मोरे, राजू पाडवी , किशोर छगन पा. जयराम पटले, ढेमाचा बाबा वळवी, खेमा महाराज, रतिलाल कारभारी, जिजा कारभारी, रोजवा कारभारी, के.एम.पाटील, आर.एम.पाटील, बाळा वळवी रमेश तडवी हे उपस्थित होते.