आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

0

पिंपरी: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना आमदार महेश लांडगे हे त्यांच्यासोबत होते.