आमदार राजसिंह ठाकूर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

0

जळगाव । भाग्यनगर(हैद्राबाद) येथील आमदार राजसिंह ठाकूर यांच्यावर 9 एप्रिल रोजी मध्यरात्री बीड येथे प्राणघातक हल्ला झाला. ते बीड येथील सभा आटोपून भाग्यनगर जात असतांना त्यांच्या गाडीवर नजर ठेवून ट्रकद्वारे आक्रमण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविषयी ट्रक चालक आणि त्याच्या सहकार्‍याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर बजरंग दल, विश्‍व हिन्दु परिषद, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत.निवेदनात हे प्रकरण गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

धर्मांधांचे षडरंत्र उघड करा
आतापर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल येथे हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातही त्या घडू लागल्या आहेत. राजसिंह यांनी मालेगाव आणि बीड येथील सभांना जाऊ नये , म्हणून प्रतिदिन देश-विदेशांतून शेकडो फोनकॉल्स द्वारे धमकवण्यात आले. हे फोन आजही चालू आहेत. तरीही धर्मांधांच्या या धमक्यांना न जुमानता राजसिंह यांनी 7 एप्रिल ला मालेगावच्या आणि 8 एप्रिलला बीडच्या सभेला संबोधित केले. रात्री बिडची सभा आटोपून भाग्यनागरकडे निघाले असता नियोजनपूर्वक त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याकडे केवळ अपघात म्हणून न पहाता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि धर्मांधांचे षड्यंत्र उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आली.