भुसावळ : माजी मंत्री व भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांसह मित्र परीवारातर्फे सोमवार, 11 रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे सोनिच्छा वाडीतील शाळेला तीन कपाट भेट देण्यात येणार आहे. याच मंडळातर्फे तालुक्यातील मुसाळतांडा येथील जि.प.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. चुडामण भोळे व सुरजसिंग पाटील यांच्यातर्फे खडका येथील ज्ञानज्योती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
आमदारांचे खास कार्यकर्ते असलेल्या नारायण कोळी यांच्यातर्फे साकरी जि.प.शाळेतील क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप कार्यक्रम होणार आहे. माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्यातर्फे गडकरी नगरातील संत गाडगेबाबा वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच सावकारे परीवारातर्फे याच शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन दिले जाणार आहे. वरणगावातील कार्यकर्ते गणेश धनगर यांच्यातर्फे रामपेठ चौकात आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. दरम्यान, आमदार सावकारे यांच्या समर्थकांनी शहरातील चौकाचौकात शुभेच्छा फलक लावून आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.