आमदार सुरेश भोळे यांचे मोबाईल लंपास

0

जळगाव। काही दिवसापूर्वी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल यांना झेड प्लस सुरक्षा असतांना देखील त्यांचे 1 लाख 50 रुपये किंमतीचे दोन मोबाईल रेल्वे प्रवास करत असतांना चोरीस गेले होते. ही घटना ताजी असतांनाच जळगाव तालुका मतदारसंघटाचे भाजप आमदार सुरेश दामु भोळे यांचे 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीस गेल्याची घटना मंगळवारी 3 रोजी घडली. भोळे सीएसटी ते जळगाव असा प्रवास पठाणकोट एक्सप्रेसमधून करत होते. ठाणे-कसारा दरम्यान वातानुकुलीत डब्यातुन अज्ञात चोरट्यानी मोबाईल लांबविले. या घटनांमुळे रेल्वेतील प्रवाशांच्या सामानाचा सुरक्षिततेचा प्रश्‍न एैरणीवर आला आहे.

आमदार भोळे हे सीएसटी ते जळगाव असा प्रवास 11057 डाऊन मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातील बर्थ नं.35 व 36 वरून करित होते. पहाटे 1.15 वाजेदरम्यान कसारा रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी ते झोपले असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचे सॅमसंग कंपनीचे सुमारे 1 लाख 30 हजार रूपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल लंपास केले. याबाबत आमदार भोळे यांनी फिर्याद दिल्यावरुन भुसावळ येथील लोहमार्ग रेल्वे पो.स्टे.ला शुन्य क्रमांकाने नोंद करण्यात आली असून हा गुन्हा कल्याण येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.