फैजपूर- जिल्ह्यात पोषण आहाराचा विषय गाजत असतांना शुक्रवारी पुन्हा विद्यर्थ्यांचा तोंडाचा घास हिसकावणारी घटना भालोद येथील आमदार हरीभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या महाविद्यालयात घडली. पोषण आहाराचा तांदूळ (रीक्षा एम.एच 19 ए एक्स 9810) द्वारे चोरून नेत असल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी नागरीकांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस आली. शाळेच्या आवारातून पोषण आहाराचा तांदूळ घेऊन निघणारी रीक्षा समोरच बसलेल्या नागरीकांनी पडकली. या रीक्षात दोनशे किलोच्या जवळपास पोषण आहाराच्या पाच गोण्या होत्या. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणाले की, पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जात असलेल्या रीक्षाचे काही नागरिकांनी चित्रीकरण सुद्धा केलेले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तांदुळाच्या प्रत्यक्ष तांदुळाचा साठ्याचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान चोरीचा तांदूळ कुठे व कुणाकडे जात होता ? याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. घटनास्थळी कॉन्स्टेबल विकास कोल्हे व गोकुळ तायडे यांनी भेट दिली. गटशिक्षणाधिकारी यांना गुन्हा दाखल करणार का विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांनी तांदूळ पकडून दिला त्यांनी फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल होईल. दरम्यान या कृत्यात कुठला अधिकारी वा शिक्षक वा अन्य कुणाचा सहभाग आहे? याबाबत चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.