आमोदा फाट्याजवळून चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव : शहरासह तालुक्यात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव रस्त्यावरील आमोदा फाट्याजवळून तरुण शेतकर्‍याची दुचाकी लांबवण्यात आली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सततच्या चोर्‍यांमुळे वाहन मालकांमध्ये घबराट
सुनील जनार्दन सोळंके (32, रा.कोळन्हावी, ता.यावल) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सुनील हा शुक्रवार, 11 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता कामानिमित्ताने दुचाकी (एम.एच.19 बी.आर.4469) ने गावाजवळ असलेल्या विदगाव रोडवरील आमोदा रस्त्यावर आला व त्याने दुचाकी पार्क केली मात्र काही वेळातच चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विलास शिंदे करीत आहे.