आमोदा शिवारातून महागडी बाईक लांबवली

Thieves stole a bike worth 60 thousand rupees from Near Masaka फैजपूर : आमोदा शिवारातील मसाका कारखान्याजवळील तुलसी पान सेंटरजवळून चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
ललित मधुकर सपकाळे (24, कोळीवाडा, आमोदा, ता.यावल) या तरुणाने मसाकाजवळ दुचाकी (एम.एच.19 डीटी 6635) लावली असता चोरट्यांनी संधी साधून मंगळवारी रात्री 7 ते 10 दरम्यान 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. तपास नाईक महेश वंजारी करीत आहेत.