आमोद्या जवळ अपघातात फैजपुरच्या दोन तरुणांचा मृत्यू

0
अपघातात नगरसेवकाच्या भाऊंचा समावेश
फैजपूर:– फैजपूर-आमोदा रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने फैजपूर येथील दोन तरुणांचा झाडावर गाडी आदळून अपघात झाला या अपघातात फैजपूर येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली.
सुतार वाड्यातील रहिवाशी स्वप्नील किशोर निंबाळे (वय 33), विक्की संजय अडवडकर (वय 24) हे दोघे मामेभाऊ फुइभाऊ भुसावळवरून दुचाकीने फैजपूरकडे येत होते. रात्री समोरील गाडीच्या लाईटाने अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या वळणावर झाडावर गाडी आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण फैजपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह यावल रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्वप्नील व विक्की हे गावात सर्वांना परिचित असून दोघ मनमिळावू स्वभावाचे होते.
स्वनिल किशोर निंबाळे हे फैजपूर पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमोल निंबाळे यांचे मोठे बंधू होत. स्वप्नील यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले आहे.