बुलंदशहर-कथित गोवंश हत्येच्या संशयाने हिंसाचार होऊन उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये सुबोध कुमार सिंह या पोलीस निरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने देशभरातील वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहे. शहीद अधिकाऱ्याच्या बहिणीने आम्हाला आर्थिक मदत नको न्याय हवा आहे. मुख्यमंत्री फक्त गाय, गाय करत असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.