आम्ही ‘काळा’बरोबर कधी चालणार आहोत?

0

पालकत्व म्हणजे आपल्या मुलांचे हित जोपासण्यासाठी केलेला खटाटोप. ही जबाबदारी आपण (म्हणजे आई,वडिलांनी घरात) जर कर्तव्यभावनेने पार पाडली तर आपली लेकरं छान घडतात हो. निरोगी मनानं वाढतात हो पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्याला असल्याचं सुख नसतं हो. नसल्याचे दु:ख फार असतं हो. व तेच आम्ही घरीदारी, लेकरांसोबत उगाळत बसतो हो. ! लेकरं वाढताय आभासी जगात, त्याच्या अपेक्षा वाढल्यास तिथे भावभावनांना स्थान महत्त्व राहिलेले नाही हो! पण काळाची पावलं ओळखत सुसंवाद साधत आम्ही लेकरांना घराजवळ आणू शकतो हो! एक छोटसं उदाहण देऊ? ‘हात धुतल्याशिवाय जेवायचं, खायचं, प्यायचं नाही’ असं लहान मुलांना घरी, शाळेत सांगतात. पाय न स्वच्छ करताच जेवायला बसतात. मग आसपासची माणस त्यांना (छानशी समजुतीच्या शब्दात) आठवण करुन देतात. मुलं थोड्याशा नाखुशीनेच ताटावरनं उठून हात धुवून येतात. मग ती जेवतात. सातत्याने ही गोष्ट करुन घेतल्यामुळे ती इतकी अंगवळणी पडून जाते की? अशा मुलांना मोठेपणी हात धुतल्याशिवाय जेवायला बसल्यास जेवण गोड लागत नाही.

लेखाची सुरुवात मी करतोय ती एका गोष्टीपासून. गोष्ट आहे इसापची. तुम्हाला इसापच्या शेकडो नीतिकथा माहितीये तसेच ’इसापनिती’ हा जागतिक कीर्तीचा अमर ग्रंथ आहे, हेही माहीत आहेच. इसापच्या सार्‍या गोष्टी तशा लहान पण महान जीवनविषयक सत्ये त्यात गोवली आहेत. त्या गोष्टी इसापने जरी पशुपक्ष्यांच्या माध्यमातून सांगितल्या तरी त्या आपल्या आहेत, हे ध्यानी ठेवा. तर एके दिवशी इसाप गावावरच्या एका मोठ्याशा दगडावर बसला होता. तेवढ्यात एक माणूस तिथे आला आणि म्हणाला. ”मला ती समोरची टेकडी ओलांडून त्या मागच्या गावाला जायचंय तर किती वेळ लागेल?” इसाप त्या माणसाला म्हणाला, ”चालायला लाग म्हणजे सांगतो” तो माणूस वैतागला तरीही त्याने पुन्हा तोच प्रश्‍न इसापला विचारला. परत इसाप म्हणाला. ”चालायला लाग म्हणजे सांगतो” तो माणूस अधिक वैतागला व टेकडीच्या दिशेने चालू लागला. तो थोडा पुढे जात नाही तोच इसापने त्याला हाका मारत बोलावले. वैगागलेला तो माणूस ‘उत्तर’ मिळेल म्हणून परतला. तेव्हा इसाप म्हणाला, ”तुला ती समोरची टेकडी ओलांडून त्या गावी जायला तासभराचा वेळ लागेल” यावर तो माणूस इसापला म्हणाला, ”थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला उत्तर विचारलं तेव्हा तुम्ही ते कां दिलं नाही?” इसाप हसून म्हणाला. ”मी तुला म्हणालो होतो, चालायला लाग म्हणजे सांगतो. तू चालायला लागलास मला तुझा वेग कळला. त्यावरच मी गणित केलं व उत्तर दिलं.”

– मित्रहो, वाचकहो हे असे आहे. जेव्हा आपण (काळानुरुप) चालायला लागतो. तेव्हा मार्ग सापडतो. दिशा कळते, वेगही कळतो व आपण जिथे पोहचायचं तिथे (नियोजनानुसार) पोहचतो. पण नाही? आम्हाला आमच्याच (खूपशा) प्रश्‍नांची उत्तरं इतरांकडनं हवी असतात. अहो प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या वाईट अनेक घटना येणारच, घडणारच त्यांची ’हाताळणी’ कशी करायची हे दुसरी कुठचीही शक्ती किंवा व्यक्ती ठरवणार नसते. ते तुम्ही वा दोघांनी (वा घरच्यांनी) ठरवायाचं असतं. इसाप म्हणतो त्याप्रमाणे चालावं लागतं व अनुभवाने शहाणपण मिळावावं लागतं व त्यासाठी आवश्यक ठरतो तो संवाद! वा संवाद कौशल्य!!!

मित्रहो, विज्ञानाने जगं ’खूपचं’जवळ आलेय हो. पण माणसामाणसातील संवाद (दिवसांगणिक) कमीकमी होत चाल्लाय. आणि हो, संवाद हा तर मानवतेचा मुख्य आधार या आधारवडाचा प्रेम, सहकार्य, त्याग इत्यादी भावनांच्या पारंब्या फुटून ’मानवता’ विस्तारत गेली. फुलत, फळत गेली. याच आधारवडाच्या आधाराने विज्ञान, तंत्रज्ञान विस्तारत गेले. परंतु या विज्ञानानेच आता भाषेची गरज खुंटवीत आणली आहे. टीव्ही, मोबाईल, नेट आणि इतर स्वयंचलित यंत्रामुळे एका माणसाला दुसर्‍या माणसाची बोलण्याची गरज वाटेनाशी झालीय. एक गोष्ट मित्रहो मी इथे स्पष्ट करतो, ती म्हणजे ही सारी यंत्रे, या सार्‍या सुविधा वाईट आहेत का? नाहीत. काळाची ती गरज आहे, कसा कुठे व किती वेळ करायचा हे तर आपण (च) ठरवू शकतो ना? लेकरांना त्यांचे उपयोग शिकवा पण त्याचा दुरूपयोग करुन ’नको त्या गोष्टी शिकू नकोस लेकरा’ हेही सांगा. अहो, लेकरांच्या मेंदूत काय भरावं, कसं भरावं, कोणत्या गोष्टी ‘केव्हा’ सांगाव्यात, सांगू नयेत आणि त्यांना कसं हुशार व्यवहारी ‘माणूस’म्हणून घडवावं याचे खूपसे प्रयोग झाले. होताय ते त्यांना (स्वत:च्या उदाहरणांनी) दाखवा. एक गोष्ट अजून सांगू का? पालकत्व म्हणजे काय हो? तर ‘स्वनियंत्रणाचं शिक्षण म्हणजे पालकत्व!’ तुम्ही नियंत्रणानं वागा, मुलं (लेकर) अपोआप नियंत्रणात वागतात.

एक छोटसं उदाहण देऊ? ‘हात धुतल्याशिवाय जेवायचं, खायचं, प्यायचं नाही’ असं लहान मुलांना घरी, शाळेत सांगतात. पाय न स्वच्छ करताच जेवायला बसतात. मग आसपासची माणस त्यांना (छानशी समजुतीच्या शब्दात) आठवण करुन देतात. मुलं थोड्याशा नाखुशीनेच ताटावरनं उठून हात धुवून येतात. मग ती जेवतात. सातत्याने ही गोष्ट करुन घेतल्यामुळे ती इतकी अंगवळणी पडून जाते की? अशा मुलांना मोठेपणी हात धुतल्याशिवाय जेवायला बसल्यास जेवण गोड लागत नाही. यालाच चांगले संस्कार असं म्हणतात. फक्त त्यासाठी पालकांनी आपल्या लेकरांसाठी पुढील पाच वाक्य ध्यानी ठेवावीत व म्हणावे 1) लेकरा माझं (आमचं) तुझ्यावर खूप प्रेम आहे. 2) आमचा तुझ्यावर खूप विश्‍वास आहे, 3) तू हे (काम) किती छान केलंस, 4) तुझं मत आम्हाला (घराला) महत्त्वाचं वाटतं, 5) सॉरी बरं का! आमच्या लक्षात नाही आलं.

वाचकहो, पालकत्व म्हणजे आपल्या मुलांचे हित जोपासण्यासाठी केलेला खटाटोप. ही जबाबदारी आपण (म्हणजे आई,वडिलांनी घरात) जर कर्तव्यभावनेने पार पाडली तर आपली लेकरं छान घडतात हो. निरोगी मनानं वाढतात हो पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्याला असल्याचं सुख नसतं हो. नसल्याने दु:ख फार असतं हो. व तेच आम्ही घरीदारी, लेकरांसोबत उगाळत बसतो हो. ! लेकर वाढताय आभासी जगात, त्याच्या अपेक्षा वाढल्यास तिथे भावभावनांना स्थान महत्त्व राहिलेले नाही हो! पण काळाची पावलं ओळखत सुसंवाद साधत आम्ही लेकरांना घराजवळ आणू शकतो हो!

वाचकहो, इथं एक छोटीशी कविता मी देतोय. कविता रविंद्रनाथ टागोरांची. ते म्हणतात- ‘जगभर प्रवास केला मी, नद्या आणि पर्वत पहाण्यासाठी, दूरवर भटकलो, सारं काही पाहिले, पण अंगणातल्या गवतपात्यावर, विसावलेला दवबिंदू पहायचाच विसरलो. एक दवबिंदू, त्यांच्या रक्ताच्या परिघात सारं जगच प्रतिबिबिंत झालं होत. भोवतालचं!’ आम्ही दूरचं खूप पाहतो. त्यावर नको, तेवढी चर्चा करतो. पण घरातलं लेकराचं विश्‍व पाहत नाही, ते जाणून घेत त्यांना 24 तासांतील एक तास वेळ देत नाही वा त्यांना जवळ बसवत त्यांच छोटसं जग जाणून घेत नाही. अशावेळी ‘आम्ही’ हे सर्व करतो ते लेकरांनो तुमच्यासाठी ‘असं’ म्हणण्याचा आम्हाला खरंच अधिकार आहे, असो.

मित्रहो, माझ्या या लेखसोबत मी माझा व पालकवर्गाचा एक फोटो मुद्यामच दिलाय व सर्वाना मी प्रश्‍न विचारतोय. “आम्ही ’काळा’ बरोबर कधी चालणार आहोत? ” मला इथ एक छानसं वाक्य आठवलं. ते आहे. विल्मा रुडॉल्फ यांचं. ते म्हणतात ‘माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, मी कधीच चालू शकणार नाही. पण माझी आई म्हणाली की, मी नक्की चालू शकेल आणि माझा माझ्या आईच्या बोलण्यावर विश्‍वास बसला’ थोडक्यात सांगायचं तर पालक आणि पाल्य यांच्यातील नात्याचा पाया म्हणजे प्रेम आणि विश्‍वास तो संपादन करण्यासाठी परत ध्यानी ठेवा इसापचा कानमंत्र ’चालायला लागा!’

चंद्रकांत भंडारी 
शिक्षण सम
न्वयक, के.सी.ई, जळगाव

मो. 9890476538