मुंबई: राज्यात सत्ता संघर्ष शिंगेला पोहोचला आहे. भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेने युतीला कौल दिला असल्याने युतीने सरकार बनवावे, आम्हाला विरोधी पक्षाचा कौल दिला असल्याने आम्ही विरोधात बसू असे विधान केले आहे. परंतु दोन-तीन दिवसानंतरची परिस्थिती वेगळी असली तर सत्ता स्थापनेबाबत काय तो निणर्य घेऊ असे देखील शरद पवारांनी सांगितले आहे. आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी सरकार स्थापनेबाबत वक्तव्य केले.
भाजप-शिवसेनेची युती ही २५ वर्षापासूनची आहे, त्यांनाच आता जनतेने सरकार स्थापनेसाठी कौल दिला असल्याने त्यांनी सरकार बनवावे, आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा कौल मिळाल्याने आम्ही विरोधात बसू असे शरद पवारांनी सांगितले.