नवी दिल्ली – जेईई-एडव्हान्स्ड प्रवेश परीक्षेत १८ बोनस पॉइंट देण्याबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील आयआयटी, ट्रीपलआय टी आणि एनआयटी सहीत अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील काउन्सिलिंग आणि प्रवेश प्रक्रियेवर तत्काळ स्थगिती आणली आहे.
बोनस पॉइंट देण्यावरचा निर्णय झाल्यानंतरच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेश देता येतील. याबाबत १० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आयआयटीने संयुक्त प्रवेश परीक्षेत रसायनशास्त्र आणि गणिताच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना १८ ग्रेस पॉइंट दिले आहेत. तामिलनाडू स्थित याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने लक्ष वेधले आहे की ज्यांनी हे प्रश्न सोडवले नाहीत त्यांनाही ग्रेस पॉइंट देण्यात आहेत. प्रश्न न सोडवणाऱ्यांना गुण का देता, असा याचिकाकर्त्याचा प्रश्न आहे. या ग्रेस पॉइंटमुळे संपूर्ण गुणवत्ता यादीवर विपरीत परीणाम झाल्याचे त्याचे म्हणणे आहे.