जळगाव । इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे विविध मागण्यासाठी चलो दिल्ली’ अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्ताने 7 जून रोजी दिल्ली येथे राजघाटापासून इंदिरा गांधी स्टेडियमपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात देशभरातील 10 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. या दिवशी देशभरात डॉक्टरांच्या वतीने ’नो प्रिस्क्रिप्शन डे’ पाळण्यात येणार असून कोणत्याही रुग्णाला औषधी लिहून दिली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. आयएमएतर्फे मागील काही दिवसापूर्वी सत्याग्रह करण्यात आला होता. त्या वेळी केंद्र सरकारने पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. काही मागण्यांबाबत कायदा करण्यात आलेला नाही.