आयएमए संघटना 18 रोजी काळ्या फिती लावून करणार कामकाज

0
कर्नाटक सरकारने पारीत केलेल्या अमानवीय  कायद्याचा निषेध
भुसावळ : कर्नाटक शासनाने डॉक्टर्स व खाजगी दवाखान्याविषयी पारीत केलेल्या कायद्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतातील आयएमए सदस्य शनिवार, 18 रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. अशक्यप्राय असलेल्या जाचक अटी त्वरीत काढून टाकण्यात याव्या ही आयएमएची प्रमुख मागणी आहे. याबाबतचे निवेदन भुसावळ आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक जावळे, सचिव डॉ. मिलींद एम.पाटील, खजिनदार डॉ. प्रसन्ना जावळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.