मुंबई । मुंबई पुण्याहून फुटबॉल खेळाची जास्त क्रेझ कोल्हापुरमध्ये आहे. करविर नगरीतून केवळ राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तयार झाले आहेत. याच रांगेतील आणखी एक फुटबॉलपटू म्हणजे सुखदेव पाटील. बहुचर्चित इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत मागील दोन वर्षांपासून खेळणार सुखदेव यावेळी दिल्ली डायनामॉज संघाच्या गोलकिपींगची जबाबदारी सांभाळत आहेत. त्याच्याशी केलेली ही बातचित.
तुझा फुटबॉल इथपर्यंतचा प्रवास कसा होता?
मी कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवी खुरदा गावात राहतो. त्या गावात फुटबॉल वगैरे काही कोणालाच एव्हढं माहीत नव्हतं. तर शाळेतून स्पोर्ट्स मध्ये ट्रायल देत देत मी क्रीडाप्रबोधीनी पुणे मध्ये मी जॉईन झालो. तिथे एक प्रोजेक्ट आहे त्यात गावागावातून आलेल्या मुलांना त्यांच्या खेळावर निवडले जाते. म्हणजे मुलाच्या क्षमतेनुसार खेळ दिला जातो. तर मला फुटबॉल हा खेळ त्यांनी दिला. माझे आई वडील शेतकरी असल्यामुळे आम्हाला फुटबॉल विषयी काही ज्ञान नव्हतं. खेळ कसा आहे कसा खेळतात? मला काहीच माहीत नव्हतं. मी फुटबॉल प्रबोधिनी मध्ये आल्यावर कळलं सर्व खेळांबद्दल आणि फुटबॉल हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा खेळ आहे. तर तिथे मला फुटबॉलची आवड निर्माण झाली.
आयएसएल फुटबॉल स्पर्धेबद्दल काय सांगशील?
आयएसएल ही भारतातली मोठी लीग आहे. फुटबॉल मध्ये अविस्मरणीय बदल झालाय. करण पाहिले फुटबॉल एव्हढं टीव्हीवर दिसत नव्हतं जेव्हढ आयएसएल मुळे दिसतंय. गावाकडच्या लोकांनाही कळायला लागलय की फुटबॉल हाही मोठा खेळ आहे. उदा. माझ्या गावात ही कोणाला माहीत नव्हतं ह्या खेळाबद्दल मी ह्या खेळात आल्यापासून आणि आयएसएल दिसायला लागल्यापासून गावातील सर्वजण पण हा खेळ पाहायला लागली. आयएसएल फुटबॉल ने युवा फुटबॉल पटूंना खूप संधी ही उपलब्ध करून दिली आहे आणि भारतात फुटबॉल खेळणं वाढतंय.
भारतीय फुटबॉलचा स्तर काय आहे?
गेल्या दोन वर्षांपासून मी आयएसएल मध्ये खेळतोय. प्रामुख्याने आयएसएल ग्रासरुट लेव्हल वर खूप काम करते आहे. त्यामुळे फुटबॉल ची क्रेझ लहान मुलांमध्येही वाढतेय. त्याचबरोबर लहान मुलांना भारतातल्या आणि परदेशी प्रशिक्षकांचही मार्गदर्शन लाभत आहे. आयएसएल मुळे फुटबॉल ला चालना मिळाली आहे.
मुंबईविरुद्ध दिल्ली डायनामॉजची काय स्ट्रॅटेजी असेल
उद्याच्या मुंबई सोबत होणार्या मॅचसाठी आमची स्ट्रॅटेजी असेल की, आम्ही 2-3 सामने हरलो आहोत तर काही केल्या हा सामना जिंकण्याच्या हिशोबाने आम्ही मैदानात उतरणार आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकजण 100% शर्थीचे प्रयत्न करणार आहोत. हा सामना जिंकून 3 पॉइंट्स कमावण्याचा आमचा निर्धार आहे