आयकर प्रधान आयुक्तांची गोदावरीत भेट

0

जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास आयकर प्रिन्सीपल आयुक्त शंकरलालजी मिना यांनी सदिच्छा भेट देतांना वृक्षारोपण रूग्णालय पाहणी करतांना विद्यार्थ्यांशी हितगूज केली. यावेळी त्यांचे सोबत अ‍ॅडीशनल कमीशनर सुदेंदु दास, डॉ रविंद्र खैरनार इ गोदावरी फॉउंडेशन अध्यक्ष माजी खा डॉ उल्हास पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, लेखापाल योगेश पाटील, सुनिल बोंडे,डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुलच्या प्रिन्सीपल अनघा पाटील, विकास बेंडाळे, विकास जावळे, बापू झांबरे इ मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी मागदर्शन करतांना सुुदेंदु दास यांनी आयकर विभागाची मनातील भिती कमी होणे गरजेचे असून करदाता व विभागातील अधिकारी यांच्या संवाद होणे गरजेचे आहे सांगीतले तर शंकरलालजी मिना यांनी चित्रफितीचा उपयोग करून आयकर विभागातर्फे विविध घोषणा केल्या जात असतात. या योजनाच्या माध्यमातून करदात्याला सूट दिली जात असते त्याचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. आयकर नियमीत भरला पाहीजे तसेच नियम तरतुदी याविषयी विविध माहिती विद्यार्थ्यांना दिली.

यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर रूग्णालयाची पाहणी देखिल त्यांनी केली. यावेळी रूग्णांशी हितगूज करतांना गोदावरीच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी देखिल विविध प्रश्‍न विचारत आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. मिना व दास यांचे स्वागत माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार विद्यार्थ्यांनी केले.यशस्वीतेसाठी गोदावरी फॉउंडेशनच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.