आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि गरिबांना वाटण्याची अक्षता-अजित पवार

0

महाड-आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावे लागते, आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आले आहे असे आरोप अजित पवार यांनी केले आहे.

महाडच्या जाहीर सभेत अजित पवार यांनी केंद्र आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाची जाहिरात करून भाजपाने सत्ता मिळवली. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगत जातीविरोधी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे, त्याला साथ द्या असे आवाहन अजित पवार यांनी महाडमध्ये जाहीर सभेत केले.