सोयगाव। औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी पहिल्या दोन प्रवेश फेर्या मुलींसाठी आरक्षित झाल्याने सोमवारी 31 जुलै रोजी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत केवळ दोन मुलींचे प्रवेश निश्चित झाल्याने पहिल्याच प्रवेश फेरीत सोयगावला पाच अभ्यासक्रमांसाठी केवळ 36 प्रवेश झाले आहे.
सोयगावला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी वर्ष 2017-19 या वर्षासाठी पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया 31 जुलै रोजीची अंतीम तारीख होती. तंत्रशिक्षण विभागाने प्रवेशाचे निकष बदलवून मुलींना याकडे आकर्षित करण्यासाठी पहिल्या दोन प्रवेश फेर्या मुलींसाठी आरक्षित केल्या आहे.या आरक्षित फेर्यांमध्ये मुलींचे केवळ तीन प्रवेश झाले आहे.तर इतर अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता प्रवेश ग्राह्य करण्यात आले आहे.त्यामुळे पहिल्या फेरीत सोयगावला केवळ 36 प्रवेश देण्यात आले आहे. येत्या 3 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आले आहे.