रिलायन्स जियोच्या नवीन धन धना धन प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरसेलनंतर आता आयडियानेही नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा ग्राहकांना दिला जाणार आहे. ज्यात प्रत्येक दिवशी डेटा वापरण्याची मर्यादा 1 जीबी असेल, पहिल्या गुरुवारपासून एअरसेलनेही 84 जीबी डेटा देणारा प्लॅन लॉन्च केला होता.
हा प्लॅन आयडिया ग्राहकांच्या प्री-पेड ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे. यात प्रतीदिन 1 जीबी डेटा वापरण्याची मर्यादा आहे. याशिवाय रोजी अधिकतर 300 मिनिटे फ्री कॉलिंग असणार आहे. या आठवड्यात 1200 मिनिटे कॉलिंग करू शकतात.
फ्री कॉलिंगची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 30 पैसे शुल्क आकारले जाणार आहे. आयडियाच्या या प्लॅनची किंमत 453 रुपये आहे. या व्यतिरीक्त 16 रुपयांचेही रिचार्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्याच्यात 1 तासासाठी अमर्याद 3 जीबी डेटा उपलब्ध होणार आहे.