आयपीएलच्या इतिहासात गोलंदाजांचे कर्दनकाळ 5 सर्वोत्तम फलंदाज

0

मुंबई। गेल्या 9 वर्षापासून क्रिकेट फॅनचे मनोरंजन करणार्‍या आयपीएलचा शुभारंभ होणार आहे. आयपीएलमध्ये जगातील फलंदाज आपल्या फलंदाजी जादू दाखवितात. पुन्हा एकदा लवकरच सुरू होणार्‍या आयपीएल सिझनमध्ये आप आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे.गेल्या 9 आयपीएलमध्ये गोलंदाजांना रडवीणारे 5 सर्वोत्तम फलंदाज सुध्दा या सीझन मध्ये पुन्हा आपल्या फलंदाजीचा जादू दाखविण्यासाठी तयार आहे.

आयपीएलचा स्पेशलिस्ट म्हणून सुरेश रैनाची ओळख
क्रिस गेल । आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या नावापुर्वीच वेस्टइंडिज संघाचा सलामीवीर क्रिसगेलचे येते. गेल ने आयपीएलमध्ये 20 अर्धशतक आणि 5 शतके केले असून एकुण 3426 धावा काढल्या आहे.गेलची फलंदाजी चालली तर त्याला आयपीएलचे टाइटल जिकण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.गौतम गंभीर । केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरचा ही आयपीएलच्या सर्वोत्तम फलंदाजामध्ये सहभाग होतो.गंभीरने आयपीएलमध्ये 31 अर्धशतकासह 3634 धावा काढल्या आहे.गंभीरच्या नेतृत्वात कोलकत्ताचा संघ आयपीएल विजेता झाला आहे.पुन्हा एकदा कर्णधार पदाची जादू दाखविण्यासाठी गौतम गंभीर तयार झाला आहे.

भारताचे चार फलंदाज यादीत
रोहित शर्मा । भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज आणि मुंबई इडियसचा सलामीवीर रोहित शर्मा आयपीएलचा तिसरा फलंदाज आहे ज्याने सर्वाधिक धावा केल्या आहे.त्याने 1 शतकासह 29 अर्धशकते केली असून एकुण 3874 धावा केल्या आहे. रोहित शर्मा नेतृत्वात मुंबई संघाने आयपीएलचा कप जिकला आहे. सुरेश रैना । गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना सर्वाधिक आयपीएलमध्ये धावा करणार्‍यांच्या यादीत रैना दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने 1 शतक आणि 28 अर्धशतक यांच्यासह एकुण 4098 धावा केल्या आहे. सुरेश रैना आयपीएल स्पेशलिस्ट म्हटला जातो. विराट कोहली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.तो या यादीत सर्वात वर आहे. 4110 धावा विराटच्या बॅटमधून निघाल्या आहे.त्यामध्ये 4 शतक आणि 26 अर्धशतक आहे.