आयपीएलच्या मेळ्याची झाली घोषणा

0

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ४७ दिवस चालणार्‍या स्पर्धेला हैदराबादेत ५ एप्रिलला प्रारंभ होणार आहे. राज्यातील दुष्काळामुळे गेल्या वर्षी आयोजनाची संधी गमावलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदा इंडियन प्रीमिअर लीगचा रोमांच पाहायला मिळणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात प्रत्येकी सात लढती होणार आहेत. सातव्या हंगामाचा तपशीलवार कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यानुसार ५ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हैदराबाद येथील लढतीने हंगामाची सलामी होणार आहे. हैदराबादमध्येच २१ मे रोजी अंतिम मुकाबला रंगेल. देशभरातील १० वेगवगळ्या स्टेडियमवर ४७ दिवस ही टूर्नामेंट खेळली जाईल. प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळेल.

दहा वेगवेगळ्या मैदानावर सामने

एकूण १४ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून दहा वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघाची अन्य संघांशी एक लढत घरच्या मैदानावर तर दुसरी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होईल. मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, इंदूर, कानपूर, कोलकाता, मोहाली, राजकोट येथे स्पर्धेच्या लढती होतील. २०११ नंतर इंदूरला आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या तीन लढतींसाठी इंदूर घरचे मैदान असणार आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी ठिकाणाची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. येत्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २० फेब्रुवारीला होणार आहे. सात खेळाडूंना दोन कोटी रुपयांची पायाभूत किंमत मिळाली आहे. ३५१ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. यात संलग्न देशांचे सहा खेळाडू आहेत. इंग्लंडचा बेन स्टोक्स, ईऑन मॉर्गन, इशांत शर्मा यांच्यावर संघांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

केवळ आयपीएल महत्त्वाची नाही -इशांक जग्गी

देशासाठी खेळायला मिळाले नाही तर चालेल, पण आयपीएलमध्ये संधी मिळायला हवी किंवा आयपीएलमुळेच भारतीय संघात स्थान मिळते, असा चुकीचा समज युवा पिढी करीत असल्याचे झारखंडचा अष्टपैलू खेळाडू इशांक जग्गीने म्हटले आहे. आयपीएल हे एक व्यासपीठ असले तरी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे ते एकमेव व्यासपीठ नाही, असे इशांक सांगत होता. ‘‘भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएल हे फक्त एकच व्यासपीठ नाही, तर रणजी करंडक स्पर्धा आणि अन्य स्थानिक स्पर्धाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवता येऊ शकते. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यावर आयपीएलमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली तर भारतीय संघाचे दार ठोठावता येऊ शकते आणि त्यासाठीच मी प्रयत्नशील आहे,’’ असे इशांक म्हणाला. दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत दमदार फलंदाजी करूनही इशांकचे नाव आयपीएलच्या लिलावाच्या यादीत घेण्यात आले नव्हते. याबाबत इशांक म्हणाला, ‘‘या मोसमात माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे. मी या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. चांगली कामगिरी करूनही काही वेळा संधी मिळत नाही. हा दैवाचा भाग असावा. पण एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मला अजून प्रगती करायला हवी. या गोष्टींमुळे मला मानसिक बळ मिळते. जवळपास प्रत्येक खेळाडू एकाच स्तरावर असतात, पण मला माझा स्तर उंचवायचा आहे.’’

यावेळी अफगाणिस्तानचे खेळाडूही समावेश

आयपीएलसाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. खेळाडूंच्या लिलावात सध्या दमदार फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर लागणाऱ्या बोलीवर तर सर्वांचे लक्ष असेलच, पण यावेळी सहकारी संघांमधील सहा खेळाडूंना देखील यावेळी आयपीएलमध्ये आपले नशीब आजमवण्याची संधी मिळणार आहे. यातील पाच खेळाडू हे अफगाणिस्तानच्या संघाचे असणार आहेत. अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद याने गेल्या काही वर्षांत आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोहम्मद शेहजादसोबतच अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्तानजकई याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू मोहम्मद नबीचे नाव देखील आघाडीवर आहे. दौलत जारदान याच्यावरही आयपीएलच्या संघ मालकांची नजर यावेळी पडू शकते.