आयपीएल सामन्यांची वेळ बदलणार

0

मुंबई । बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या चाहत्यांना महत्त्वाची बातमी देणार आहे. आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून त्याचा फायदा निश्चितच प्रेक्षकांना होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) टीव्ही ब्रॉडकास्ट स्टार इंडियासमोर एक प्रस्ताव ठेवलाय. हा प्रस्ताव टीव्ही ब्रॉडकास्टने मान्य केल्यास आयपीएल 2018चे सामने रात्री 8 वाजता सुरु होण्याऐवजी संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. गेल्या 10 वर्षांपासून आयपीएलचे सामने 8 वाजता सुरु होतात. गेल्या 10 वर्षांपासून आयपीएलच्या प्रसारणाची वेळ दुपारी 4 वाजता आणि रात्री 8 वाजता होतेय. आयपीएल संचलन समितीच्या सदस्यांनी एक तास आधी हे सामने आयोजित केले जावेत, अशी मागणी केली आहे. कारण प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत सामन्यासाठी थांबत नाही. सामन्याची सुरुवात एक तास आधी केल्यास लोक सामन्याचा अधिक आनंद घेऊ शकतील.

संघमालकांकडून स्वागत
आयपीएल संचलन समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हटले की, वेळेबाबतच्या या निर्णयाचे सगळेच समर्थन करत आहेत.
मात्र यासाठी आम्हाला अधिकाधिक ब्रॉडकास्टशी चर्चा करावी लागेल. दरम्यान, आयपीएलच्या सर्व संघ मालकांनी या प्रस्तावाचे स्वागत
केले आहे.