आयपीएल सोडून डिव्हिलियर्स मायदेशी रवाना

0

नवी दिल्ली । खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे दहाव्या सत्रातून आरसीबी प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. आरसीबीला 13 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. संघाच्या या निराशजनक कामगिरीनंतर ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना झाला आहे. ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली.आपल्या ट्विटमध्ये आरसीबीच्या दहाव्या सत्रातील कामगिरीवर निराश असल्याचे त्याने सांगितले.

प्लेऑफचे संघ जवळपास निश्चित
या सत्रात आम्हाला कठीण गेलं असले तर याधून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. याचा फायदा पुढील वर्षी होणार्‍या स्पर्धेत होईल अशी आशा आहे. मी आनंदी आहे जूनमध्ये होणार्‍या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी कुटुंबासमवेत आहे, असेही तो म्हणाला. परवाच आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमातील निराशाजनक कामगिरीबद्दल बंगळुरुवासियांची आणि संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. विराट कोहलीने संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन संघाच्या चाहत्यांची आणि समर्थकांची माफी मागत पाठिंबा देणार्‍या चाहत्यांचे आभार मानले होते. आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. मुंबई, कोलकाता आणि पुण्याचा प्रवेश निश्चित असून पंजाब आणि हैदराबादमध्ये अद्याप चुरस आहे.