नवी दिल्ली : आयपीएल 2019 सालीच्या बाराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाची तारीख निश्चीत झाल्याचं वृत्त समोर येतं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 18 डिसेंबरला दुपारी 3 वाजता हा लिलाव पार पडला जाणार असून या लिलावाची जागा अजुन निश्चित करण्यात आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमध्ये हा सोहळा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वसाधारणपणे आयपीएलच्या लिलावाला सकाळी 10 वाजता सुरुवात होते. आगामी हंगामाचा लिलाव हा प्राईम टाईममध्ये म्हणजेच दुपारी 3 वाजता ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय. 3 वाजता सुरु होणारा लिलाव हा रात्री साडे नऊ वाजता संपेल, अशी सुचना सर्व संघमालकांना देण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे या लिलावात नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि कोणता खेळाडू कोणाच्या संघात जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.