आयरोबोटद्वारे भारतात ‘रूम्बा९६०’ सादर

0

मुंबई : प्यूअरसाईट सिस्टीम्सप्रा.लि. आयरोबोटने भारतात ‘रूम्बा९६०’ हे रोबोटिक उपकरण सादर केले आहे. याद्वारे, कठीण टोकांवरील आणि कोप-यांमधील धूळ आणि घाण सहजगत्या साफ करता येते आणि ही घरकाम करणा-र्यांसाठी अतिशय दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यासोबतच, आयरोबोट अॅप सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कोणत्याही कामावर, कोठूनही नजर ठेऊ शकते, ज्यामुळे हे काम अतिशय सोपे बनते. डिस्कच्या आकाराचा स्वच्छता करणारा रोबो कोणत्याही प्रकारची जमीन स्वच्छ करू शकतो, आणि विविध उच्च तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्यांसाहित उपलब्ध असून, किमतीला न्याय देणारी कामागिरी देतो. हे उपकरण अमेझॉन.इनवर ४९,९००/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

रूम्बा९६० सोप्या, डिस्कच्या आकारात, राखाडी रंगात, आणि सध्या उपलब्ध असणार्या् इतर यंत्रांपेक्षा अतिशय सुरेख रचनेत उपलब्ध आहे. सोप्या डिझाईनमुळे रूम्बा९६० सर्व फर्निचरच्या खालती, तसेच पोहोचायला अवघड असलेल्या जागी जाऊन, अतिशय नीटनेटकी स्वच्छता सोपेपणाने करून देतो. आयअॅडाप्ट® २.० व्हिज्युअल लोकालायझेशनसहित नेव्हीगेशनमुळे रूम्बा तुमच्या घरातील प्रत्येक पातळीवरील स्वच्छता करू शकतो.

रूम्बा९६०च्या महत्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये एरोफोर्स® ३-स्टेज क्लिनिंग सिस्टीम, आपोआप रिचार्ज, अधिक खोल्यांमध्ये जाण्याची क्षमता, आयरोबोट होम अॅप आदी. वैशिष्ट्यांचा समावेश आहे.