जळगाव । पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळा पोलिस स्टेशन समोर गाडीने एका इसमास चिरडल्याची घटना रविवार 12 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. वामन काशिनाथ पाटील (65, रा. मंगरूळ ता.पारोळा) येथे बाजार करण्या साठी आलेले होते बाजार करून परतत असतांना महामार्गवरून बस स्थानकाकडे जात असतांना जळगांव कडून धुळयाकडे भरधाव वेगात जाणारी आयसर गाडी क्रमांक एम एच 18 बी जे 9931 वरील ड्रायव्हर सचिन (ढोली) याने वामन पाटील याना भरधाव धडक दिली ते मागिल चाका खाली आल्याने गाडी त्याच्या पोटावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. याबाबत पारोळा पोलिसात डॉ. सुनिल अभिमन पाटील (रा.मंगरूळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सचिन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अजितसिंग देवरे व कॉ. सुधीर चौधरी करीत आहेत. दरम्यान महामार्गावरून मयत वामन पाटील जात असतांना आयसर गाडीच्या किन्नर साईडला शिडी बांधलेली होती. या शीडीत वामन पाटील अडकले नंतरखाली पडून मागील चाकात आल्याने ते मयत झाल्याचे समजते अपघात होताच ट्रक सोडून चालक फरार झाला आहे.