आयसीसीच्या क्रमवारीत मितालीची घसरण!

0

नवी दिल्ली । भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलीसे पेरीने आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर झेप घेत मितालीला मागे टाकले.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पेरीने आपल्या कारकिर्दीत प्रथमच फलंदाजीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लायनिंग आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे, तर मिताली राजची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. दरम्यान, भारताची हरमनप्रीत कौरच्या क्रमवारीमध्येही दोन स्थानांनी घसरण झाली. ती सध्या सातव्या स्थानावर आहे. तर सलामीवीर स्मृती मानधनाने 21 व्या स्थानावरुन 14 व्या स्थानी झेप घेतली. द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे स्मृतीने क्रमवारीमध्ये झेप घेतली. तिने आफ्रिकेविरुद्ध एक अर्धशतक व एक शतक झळकावले.