दुबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारताचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराने तिसर्या स्थानावर झेप घेतली आहे. पुजारा कसोटी क्रमवारीत 873 अंक मिळवून तिसर्या स्थानावर आहे. या क्रमवारीत आस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ गेल्या दोन वर्षांपासून पहिल्या क्रमाकावर कायम आहे. इंग्लंडविरुध्दच्या तिसर्या अॅशेज कसोटीत त्यांने द्विशतक फटकावले होते. तसेच गोलंदाजांच्या यादीत भारताचा रवींद्र जाडेजा, अश्विनने आघाडी घेतली आहे.
स्मिथ ब्रॅडमॅनच्या रेकॉर्डजवळ
तिसर्या अॅशेज टेस्टमध्ये 239 धावा करणार्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथचे 945 अंक आहे आणि तो लेन हटनसोबत या यादीत दुसर्या स्थानावर आहे. ब्रॅडमनचे 961 अंक आहेत, या अंकांपासून स्मिथ 16 अंकाने मागे आहे. पहिल्या क्रमांकावर राहत सर्वाधिक टेस्ट खेळण्याबाबतीत स्मिथ ब्रॅडमनच्या पुढे आहे. तो 114 टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकाच्या रँकिंगवर आहे. त्याच्या पुढे गॅरी सोबर्स(189), विव रिचर्डस(179), ब्रायन लारा(140) आणि सचिन तेंडुलकर (139) आहे.