आयुक्तांची बदली करुन चौकशी करा

0

कार्यकर्ते भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर भ्रष्ट कारभाराला पाठिशी घालत आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी. त्यांच्या कार्यकाळातील सर्व निर्णयांची उच्चस्तरिय समिती नेमूण चौकशी करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

आयुक्तांच्या आशिर्वादाने गैरकारभार
पत्रकात म्हटले आहे की, मागील आठ महिन्यात 750 कोटी रकमेपेक्षा अधिक रकमेची कामे मंजुर करण्यात आली आहेत. यामध्ये आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे म्हणून तशा अटी-शर्थी बनवायच्या, रिंग करायच्या आणि त्यातून टक्केवारी वसूल करण्याचे काम सुरु आहे. हे सगळे आयुक्त हर्डीकर यांच्या आशिर्वादाने सुरु आहे. ते भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या नार्‍याला तिलांजली देत आहेत. त्यामुळे आयुक्तांची त्वरित बदली करावी. त्यांच्या कार्यकाळातील निर्णयांची उच्चस्तरिय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.